जमीन व्यवहारासाठी दिलेल्या धनादेशाचा अनादर, तरुणाला कारावास


जमीन व्यवहारातील दिलेल्या धनादेशाचा अनादर झाल्याप्रकरणी संशयिताला न्यायालयाने ६ महिने साधा कारावास व भरपाई म्हणून १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. कृष्णकांत केशव नागवेकर (४०, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध उमाकांत शंकर सनगर (५८, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली होती.
कृष्णकांत व उमाकांत यांची आंबा व्यवसायातून ओळख निर्माण झाली होती. दरम्यान कृष्णकांत याला आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्यांनी आपली टेंभ्ये व लांजा येथील जमीन उमाकांत याला विक्री करण्याचे ठरविले. या जागेच साठेखत तयार करताना उमाकांत यांनी ६ ला रुपये कृष्णकांत यांना दिले होते. जागेच्या व्यवहाराचे पैसे देऊनही कृष्णकांत यांनी उमाकांत यांना खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ केली. कृष्णकांत हा खरेदीखत करत नसल्याने उमाकांत यांनी आपले पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. यावेळी कृष्णकांत याने १६ एप्रिल २०१९ तारखेचा १ लाख रुपयांचा धनादेश त्यांना दिला. उमाकांत याने १ लाख रुपयांचा धनादेश बँकेत जमा केला असता पुरेशी रक्कम नसल्याने धनादेशाचा अनादर झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button