चुलीपाशी शेकोटी घेताना भाजलेल्या चांदेराईतील महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू


चुली जवळ शेकोटी घेताना भाज्ूान जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मुंबई येथील मसिना रुग्णालयात 5 जानेवारी रोजी रात्री 11.39 वा.सुमारास मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहेसेजल संतोष गुरव (42,रा.चांदेराई बाजारपेठ,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी थंडी वाजत असल्यामुळे सेजल ही चुलीजवळ शेकोटी पेटवून शेकत बसली होती. त्यावेळी तिच्या अंगावरील गाउनला पाठीमागून विस्तव लागून आग लागली. तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. ती 40 ते 45 टक्के भाजल्याने तिला अधिक उपचारांसाठी 5 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना रात्री 11.39 वा.सुमारास तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सेजलला तपासून मृत घोषित केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button