चिपळूण शहरालगतील खेर्डी येथील सदनिका फोडून ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास


चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथील एका इमारतीमधील सदनिका फोडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यातून तब्बल ६ ते ७ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. ऐन निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या चोरीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. खेर्डी बाजारपेठेलगत असलेल्या एका इमारतीत मयूर खेतले यांची सदनिका आहे. खेतले कुटुंबिय गावी गेले असल्याने ही सदनिका बंद होती. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत चोरट्यांनी या सदनिकेचा मुख्य दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. कंपाटे फोडून ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button