चिपळूण शहरात भरधाव वेगाने ट्रिपल सिट चाललेले तिघे दुचाकीस्वार चक्क एका नाल्यात कोसळले.


मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील राधाकृष्णनगर येथील मुत्तपन मंदिराच्या स्वागत कमानीच्या ठिकाणी भरधाव वेगाने ट्रिपल सिट चाललेले तिघे दुचाकीस्वार चक्क एका नाल्यात कोसळले. चालकाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने तिघेजण नाल्यात पडले.त्यांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

ही घटना सोमवारी रात्री 9.15 वाजता घडली. शहरातील बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने हे तिघे तरुण ॲक्टिव्हा दुचाकीने ट्रिपल सीट चालले होते. अशातच त्यांचा राधाकृष्णनगर येथील मुत्तपन मंदिराच्या कमानी जवळ येताच दुचाकीवरील ताबा सुटला. यामध्ये हे तिघेही दुचाकीसह नाल्यात कोसळले. या नाल्यातून नगरपरिषदेची पोलादी पाईपलाईन गेली असून त्यावर हे तिघेही आदळले. त्यामुळे एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button