चिपळूण शहरातील ४ रायडर्स ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ अवॉर्डचे ठरले मानकरी


दमदार सहनशक्ती आणि सायकलिंग कौशल्याचे दर्शन घडवत चिपळूणमधील ४ रायडर्सनी ‘टूर द हंड्रेड २०२५ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेतलाया स्पर्धेत शहरातील ४ रायडर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा अवॉर्ड मिळवला. तसेच दोन रायडर्सनी प्लॅटिनम अवॉर्ड प्राप्त केले.
१०० दिवसाची ही सायकलिंग स्पर्धा असून ती दि. १३ सप्टेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ५ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत 25000+ जो स्पर्धक पॉईंट मिळवतो त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते. देश-विदेशातील तब्बल १०७७ अनेक अनुभवी सायकलपटू सहभागी झाले होते. कठीण ट्रॅक, वेळेचे बंधन आणि शारीरिक सहनशक्तीची कसोटी असलेल्या या स्पर्धेत चिपळूण सायकलिंग क्लबच्या रायडर्सनी विशेष ठसा उमटवला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चिपळूणचे विजेते आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर यांनी शंभर दिवस सायकलिंग करून तब्बल १०३८२ किलोमीटर अंतर कापून ९२४९३ उंचीचे इलेक्शन पार करून ३९६११ पॉईंट मिळवत देशामध्ये दुसरा क्रमांक प्राप्त करून ४० ते ४९ वयोगटांमध्ये देखील दुसरा क्रमांक प्राप्त करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवॉर्ड मिळविला.
एस आर श्रीकांत जोशी यांनी शंभर दिवसात १०००२ किलोमीटर सायकलिंग करून ७६०५६ उंचीचे एलेवेशन कापत ३८६३७ पॉईंट मिळवत देशामध्ये चौथा क्रमांक प्राप्त करून ५० ते ५९ वय कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवॉर्ड मिळविला. एस आर अंकुश जंगम यांनी ९९ दिवसांमध्ये १००२२ किलोमीटर सायकलिंग करून ८६००० उंचीचे एलेवेशन कापत ३७७९२ पॉईंट मिळवत देशामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला. ३० ते ४० वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून चॅम्पियन अवॉर्ड मिळविला. मलखांबपट्टू एस आर हेमंत भोसले यांनी ९८ दिवसांमध्ये ९४९० किलोमीटर सायकलिंग करून ७७४५५ उंचीचे एलेवेशन कापत ३६५१२ पॉईंट मिळवत देशांमध्ये सहावा क्रमांक प्राप्त करून ४० ते ४९ वयोगटांमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचे मानकरी ठरले. डॉ एस आर सचिन खेडेकर यांनी ८५ दिवसांमध्ये ३८८० किलोमीटर सायकलिंग करून २५२१७ उंचीचे एलेवेशन कापत १८९१६ पॉईंट मिळवत देशामध्ये १३६ वा क्रमांक प्राप्त करून वयोगटांमध्ये पाचवा क्रमांक प्राप्त करून प्लॅटिनम अवॉर्ड मिळविला. आशिष आयरे यांनी ९१ दिवसांमध्ये ४१८० किलोमीटर सायकलिंग करून ३०३९१ उंचीचे एलेवेशन कापत १७४९५ मिळवून देशांमध्ये १५९ वा क्रमांक प्राप्त करून वयोगटांमध्ये आठवा क्रमांक प्राप्त करून प्लॅटिनम अवॉर्डचे मानकरी ठरले. अद्वैत केळकर यांनी ९५ दिवसांमध्ये ३४२० किलोमीटर सायकलिंग करून २९२६९ उंचीचे एलिवेशन कापत १६६२४ पॉईंट मिळवत प्लॅटिनम अवॉर्ड मिळाला. या रायडर्सनी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये आणि श्रेणींमध्ये ठरवलेल्या वेळेच्या आत १०० दिवस सायकलिंग करून पदके आणि सन्मान मिळवले.
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रायडर्सना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि प्लॅटिनम अवॉर्डनी सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button