
चिपळूण येथील नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी संजय जाधव
चिपळूण येथील नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी संजय जाधव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला मुख्याधिकारी विशाल भोसले यांची सातारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी जाधव रुजू झाले, त्यांच्या रुपाने शहराला अष्टपैलू अधिकारी लाभला असून ते दोनवेळा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही सेवा बजावली असून इंडियन मिलिटरीमध्ये भरती झाले होते. ते तीन खेळांचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.
जाधव यांचे मूळगाव नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेळे आहे. त्यांचे पहिती ते दहावी पर्यतचे शिक्षण अहिल्यानगर जिल्ह्यातील कारगाव तालुक्यातील गौतम पब्लिक स्कूलमध्ये झाले. बारावीचे शिक्षण निफाड तालुक्यातील क.. का. नाथ विद्याभवन
व ज्युनिजर कॉलेज येथे झाले. तालुक्यात प्रथम आल होते, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्यांनी इंजिनिअरिंग केले. त्यानंतर १९९६ ते १९९८ साली खासगी नोकरी केली. १९९६ साली इंडियन मिलिटरीमध्ये त्यांची निवड झाली. मात्र घरगुती कारणामुळे ते सेवेत गेले नाहीत. २००१ मध्ये एमपीएससी तर्फे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली या पीक्षेत ते राज्यात प्रथम होते. २००४ साली केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे एक वर्ष कर्तव्य बजावले.www.konkantoday.com




