चिपळूण नगरपालिकेतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात नुकतेच निधन झाल्याने चिपळूण नगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रात आज (३० जानेवारी) श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, स्थायी समिती सदस्य उदय जुवळे, विकी नरळकर, अजय भालेकर, योगेश पवार, संजय गोताड यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button