चिपळूण तालुक्यातील ’त्या’ शिक्षकाला मिळाली न्यायालयीन कोठडी


चिपळूण तालुक्यातील एका शिक्षकाने दोन महिलांचे फोटो ’मॉर्फ’ करून ते अश्लिल अवस्थेत तयार केले. तसेच एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी देखील गैरवर्तन केल्याच्या घटनेप्रकरणी त्याच्यावर पोक्सोसह ऍट्रोसिटी तसेच माहिती व तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या शिक्षकाला सुनावण्यात आलेली एका दिवसाची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पांडुरंग गोविंद डाकरे (५७, कोल्हापूर) असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार पालकांसह ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या शिक्षकाला जाब विचारला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्याची पोलीस कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button