
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. ऋता मुल्हेरकर यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना दिल्लीत २६ जानेवारी रोजी होणार्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, नवोन्मेषक आणि धोरणकर्त्यांबरोबर या सोहळ्यातील डॉ. मुल्हेरकर यांची उपस्थिती ही त्यांच्या संशोधन कार्याची तसेच राष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे.
डॉ. मुल्हेरकर यांना जैवतंत्रज्ञान विभाग, भारत सरकार आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंन्स कौन्सिल यांच्या बायो ई ३ उपक्रमांतर्गत आमंत्रित करण्यात आले आहे. हे आमंत्रण डॉ. मुल्हेरकर यांच्या जैवतंत्रज्ञान व जैववैद्यकीय संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणारे आहे. डॉ. मुल्हेरकर यांनी भारतातील ज्येष्ठ व नामवंत जैववैद्यकीय शास्त्रज्ञ आहेत. मुखाच्या आणि सर्व्हीकल कॅन्सरवरील जीन थेरपी संशोधनात त्यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांनी एसीटीआईसी टाटा मेमोरीयल सेंटर, मुंबई येथे दीर्घकाळ सेवा बजावली आहे.
www.konkantoday.com




