
चिपळुणात १९ पासून महानिर्मितीच्या राज्यस्तरीय नाट्य
स्पर्धापोफळी येथील कोयना जल विद्युत केंद्राला २५ वर्षानंतर प्रथमच महानिर्मिती कंपनी अंतर्गत विद्युत केंद्राच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. त्यानुसार चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात १९ जानेवारीपासून ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत नाशिक, चंद्रपूर, परळी, भुसावळ, कोराडी, उरण, मुंबई, खापरखेडा आदी भागातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.महानिर्मिती कंपनी अंतर्गत विद्युत केंद्राची ही स्पर्धा दरवर्षी राज्याच्या वेगवेगळ्या भागात घेतली जाते. यावर्षी ही स्पर्धा भरवण्याचा मान पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्राला मिळाला आहे. या स्पर्धेची माहिती देताना कोयना जल विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आणि नाट्यस्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय चोपडे म्हणाले की १९ पासून २३ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी यांच्या हस्ते १९ रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उदघाटन होणार असून यावेळी महानिर्मिती कंपनीचे संचालक विश्वास फाटक, संजय मरूडकर, अजय हरणे, मनेष वाघीरकर, कार्यकारी संचालक पंजक सपाटे, राजेश पाटील, नितीन वाघ, नितीन चांदुरकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरूषोत्तम वारजूरकर उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com




