गुहागर समुद्रकिनारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर समुद्रामध्ये झेपावली कासवपिल्ले


नववर्षाच्या सुरूवातीलाच मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यामधून ३३ कासव पिल्लांचा जन्म झाला असून नवजात कासवपिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. यावर्षीच्या मोसमामध्ये आतापर्यंत २३ घरट्यांमधून २५२४ कासव अंड्यांना संरक्षण देण्यात आले आहे.
गुहागर समुद्रकिनारी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात कासव अंड्यांचे संरक्षण केले जात आहेत. समुद्रकिनारी ६ कासव अंडी उबवणी केंद्रे उभारण्यात आली असून कासव संवर्धनासाठी ११ कासवमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. येथील किनारी ऑलिव्ह रिडले या जातीचे मादी कासव अंडी घालण्यासाठी हजेरी लावत आहेत. पाऊस थांबल्यानंतर कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला असून १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुहागर समुद्रकिनार्‍यावर १२८ अंड्यांचे पहिले घरटे सापडले होते. ही अंडी तीन क्रमांकाच्या कासव उबवणी केंद्रामध्ये संरक्षित करण्यात आली होती. बुधवारी या अंड्यामधून ३३ कासव पिल्लांचा जन्म मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर झाला आहे. दक्षिण कोकण कांदळवन विभागीय वनअधिकारी कांचन पवार, रत्नागिरी कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकुर, गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्‍वर गायकवाड, कासवमित्र संजय भोसले व त्यांची ११ कासवमित्रांची टीम कासव संवर्धनाचे काम करीत आहे. बुधवारी जन्मलेल्या ३३ ऑलिव्ह रिडले कासवपिल्लांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया पार पडली. यामुळे गुहागर समुद्रकिनारी कास महोत्सवाला सुरूवात झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button