“गडकिल्ले संवर्धन”च्या रत्नागिरी विभागामार्फत किल्ले सुमारगडावर १ रोजी श्रमदान मोहीम


रत्नागिरी : किल्ले सुमारगडवरील (ता. खेड) कोसळली लोखंडी शिडी पुन्हा बसविण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागामार्फत १ फेब्रुवारी रोजी श्रमदान मोहीम राबविली जाणार आहे.

या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यांनी ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत किल्ले महिपतगड (वाडी बेलदार) पायथा येथे एकत्र जमायचे आहे. रात्री ८:३० वाजता सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येईल.

दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता आवश्यक सर्व साहित्य घेऊन चढाईस सुरुवात होईल. साधारण ८ वाजण्याच्या सुमारास ज्या ठिकाणी शिडी बसवायची आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वांचा नाश्ता होईल. सकाळी ९ वाजता शिडी बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल.

श्रमदानाचे वेळापत्रक असे असेल : सकाळी ९ ते दुपारी १.३० श्रमदान, १.३० ते २.३० जेवण, २.३० ते ३ विश्रांती, दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत उर्वरित काम पूर्ण करणे, ५ ते ६ यावेळेत दुर्ग भ्रमंती आणि सायंकाळी ६ वाजता गड उतरण्यास सुरुवात होऊन, ७ वाजता परतीचा प्रवास सुरू होईल.

या नियोजनानुसार ही संपूर्ण श्रमदान मोहीम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, सर्व मोहिमेकरांनी वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button