
खेड सहजीवन शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात आयसीएस ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा
खेड सहजीवन शिक्षण संस्था संचलित आयसीएस महाविद्यालयातील क्युएसी आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील प्रकृती फाऊंडेशनमार्फत युवा दिनानिमित्त ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत प्रकृती फाऊंडेशनच्या मिलन जंगम, श्राव्या जंगम यांनी सहभागींना ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण दिले. महाविद्यालयातील ४१ विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला. प्रशिक्षणातून घेतलेल्या कौशल्याचा वापर करत दागिने तयार केले. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांच्या हस्ते मिलन जंगम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिला विकास कक्षाच्या प्रा. राखी शेठ, प्रा. सुप्रिया गुहागरकर, प्रा. तेजल बडबे, महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य मोहिते यांच्यासह एनएसएस विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. मेघना कांबळे यांनी, तर डॉ. आर. एस. भालेराव यांनी आभार मानले.
www.konkantoday.com




