खेड भोस्ते घाटात अपघात; दोन ट्रकची धडक, एक गंभीर जखमी!


मुंबई – गोवा महामार्गावरील अपघातप्रवण भोस्ते घाटात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनवर दोन ट्रकची जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही मालवाहू ट्रक हे गोव्याहून मुंबई च्या दिशेने निघाले होते. भोस्ते घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने पुढे निघालेल्या ट्रक ला पाठीमागे धडक दिली. या दरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रक मधील चालक गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत मालवाहू ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता. त्याला मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले.

या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे मार्गावरून प्रवास करत होते. अपघात होताच त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून स्वतः खाली उतरून सुरक्षा रक्षक व इतर वाहनचालकांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला सुरक्षित बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलावून जखमीला त्वरित उपचारासाठी हलवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button