
खेड तालुक्यातील वरवली जगबुडीत आंघोळीस गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
खेड तालुक्यातील वरवली जगबुडी नदीपात्रात आंघोळीस गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संतोष दगडू आखाडे (रा. वरवली-सुतारवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने आखाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बराच कालावधी लोटूनही संतोष घरी न आल्याने त्याचे वडील दगडू गंगाराम आखाडे त्याला पाहण्यासाठी नदीपात्राजवळ गेले. त्यांना नदीपात्राच्या कडेला दगडावर कपडे व. चपला ठेवलेल्या दिसल्या. आजूबाजूला पाहिले असता तो पाण्यात तरंगताना दिसला. त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.www.konkantoday.com




