खेड तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुकराची शिकार, एक गजाआड


खेड तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील वन विभागाच्या पथकाने बाबू भागोजी शिंदे (रा.माणी-खेड) याला शिताफीने गजाआड केले. यातील दोन संशयित निसटण्यात यशस्वी झाले. पथकाकडून दोघांचाही कसून शोथ सुरू आहे. पथकाने ९६ जिवंत गावठी बॉम्ब व दोन मृत रानडुक्कर जप्त केले. तालुक्यातील काडवली येथे वन विभागाच्या पथकाकडून व्याघ्र गणनेचे काम सुरु असताना मौजे निगडे- बोरज सीमेवर माळरान क्षेत्रात राजेश भानुशाली यांचे मालकी क्षेत्रात मा.स.नं ६३/अ मध्ये ३ अनोळखी व्यक्ती दोन रानडुक्कर मृतावस्थेत घेऊन जात असल्याचे काडवलीचे वनपाल यांच्या निदर्शनास आले. यानंतर वनपाल अधिकारी यांना पाहताच संशयितांनी तेवून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यानंतर वनविभागाच्या पथका संशयितांचा पाठलाग केला. या दरम्यान बाबू भागोजी शिंदे याला पकडण्यात यत्रा आले. अन्य दोघेजण खासगी जंगलमय भागात पळून गेले याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या बाबू शिंदे याची तपासणी केली असता त्याचेकडे काळ्या रंगाचे सँगमध्ये पिवळसर पिशवीमध्ये ९६ जिवंत गावठी बॉम्ब व दोन रानडुक्कर आढळून आले. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता पोलीस चोन्डी सुनावण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button