खेडमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला ’एरो मॉडेलिंग शो’


भविष्यात मुलांमधून वैमानिक घडावेत, हा हेतू डोळ्यासमोर ठेवत खेड लायन्स क्लब ऑफ सिटी आणि शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित ’एरो मॉडेलिंग शो’ दरम्यान विद्यार्थ्यांनी १२ विमानांचा लक्षवेधी थरार अनुभवला. विविध शाळा-महाविद्यालयातील ३८०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या अक्रमांतर्गत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अनाखी आदरांजली अर्पण करत विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावनाही निर्माण करण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमाला शिवचैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांचे सहकार्य लाभले. भारतीय वायूसेनेची प्रतिक ठरलेली मिराज-२०००, तेजस, राफेल आणि सुखोई ३० या चार विमानांचा ५० ते २०० फूट उंचीवर होणार्‍या थरारक कसरती विद्यार्थ्यांना पहावयास मिळाल्या, सातारा येथील सदानंद काळे व त्यांचे जिरंजीव अथर्व काळे यांनी शोची माहिती देत प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button