कोसुंब जिल्हा परिषद गटात भाजप शिवसेना आमने सामने, रोहन बने आणि प्रमोद अधटराव या दोघांचेही अर्ज दाखल झाल्याने खळबळ!


कोसुंब जिल्हा परिषद गटात महायुती कडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांना उमेदवारी दिली, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र भाजप नेही या गटात प्रमोद अधटराव यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचे समजते. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावर शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजपची ही कृती म्हणजे केसाने गळा कापण्याचा प्रकार असल्याचे प्रमोद पवार म्हणाले.
याविषयी श्री पवार पुढे म्हणाले कीं, जागा वाटप करताना कोसुंब जिल्हा परिषद गट हा शिवसेनेच्या वाट्याला आला. तिथून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अचानक भाजप ने आपली उमेदवारी श्री प्रमोद अधटराव यांनाही दिली त्यामुळे या गटात महायुतीचे दोन उमेदवार आमने सामने आले. भाजपला हा गट हवा होता तर बोलणी सुरु असताना कां बोलले नाहीत? कुणालाही विश्वासात न घेता भाजप ची अधिकृत उमेदवारी अधटराव यांना कशी दिली जाते. असाच केसाने गळा कापायचा असेल तर तालुक्यातील शिवसैनिक आपली ताकद दाखवतील तसेच ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत अशा ठिकाणी अधिक ताकद लावून त्यांचा पराभव करू असा इशाराही प्रमोद पवार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button