कोयना जलाशयात १० फुटी महाकाय अजगर!, पर्यटकांच्या कॅमेऱ्यात व्हिडीओ कैद


कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पर्यटकांना प्रथमच दुर्मीळ अजगर आढळून आला. हा महाकाय अजगर इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा (भारतीय अजगर) असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले. पर्यटकांनी जलाशयात पोहताना या अजगराचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.हा अजगर लगतच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून वासोट्याच्या दिशेने मुनावळे परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पामुळे अलीकडे मुनावळे परिसर पर्यटकांचे नंदनवन म्हणून उदयास येत आहे. नुकताच या ठिकाणी नौकाविहाराचा आनंद घेत असताना पर्यटकांना हा अजगर आढळून आला. मात्र, वासोटा किल्ल्याच्या समोरच अजगर आढळल्याने पर्यटकांमध्ये खळबळ उडाली.

काही सर्पमित्रांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. यानंतर, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी अजगराला सुरक्षित रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. इंडियन रॉक प्रजातीचा हा अजगर जंगलातून जलाशयाकडे कसा पोहोचला, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button