
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस३० जानेवारी २०२६ पर्यंत गाड्या फक्त पनवेलपर्यंत
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या प्रवासात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या दोन्ही गाड्यांना मुंबई (एलटीटी) स्थानकात प्रवेश बंद करण्यात आला असून त्या आता फक्त पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहेत. तसेच या गाड्या पनवेलवरूनच सुटणार आहेत. हा बदल ३० जानेवारी २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
एलटीटी यार्डमधील पिट लाईन क्रमांक ३ च्या दुरुस्ती व देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत कोणतीही ट्रेन एलटीटीपर्यंत जाणार किंवा तिथून सुटणार नाही.
पनवेलपर्यंत धावणाऱ्या गाड्या :
गाडी क्र. 12620 – मंगळुरू सेंट्रल – मुंबई (एलटीटी) मत्स्यगंधा एक्सप्रेस
गाडी क्र. 16346 – तिरुवनंतपुरम सेंट्रल – मुंबई (एलटीटी) नेत्रावती एक्सप्रेस
पनवेलवरून सुटणाऱ्या गाड्या :
गाडी क्र. 12619 – मुंबई (एलटीटी) – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस
गाडी क्र. 16345 – मुंबई (एलटीटी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस
या बदलामुळे ठाणे आणि कुर्ला (एलटीटी) स्थानकांदरम्यानचा प्रवास रद्द राहणार आहे. परिणामी प्रवाशांचा प्रवासाचा वेळ व खर्च वाढला असून महिला व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.




