
कुंडीच्या देवराईत सह्याद्री राजस उर्फ़ म्हणजेच सह्याद्री सिल्व्हर रॉयल या फुलपाखराची नोंद
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण मिळालेल्या सह्याद्री राजस म्हणजेच सह्याद्री सिल्व्हर रॉयल या फुलपाखराची रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. या फुलपाखराची महाराष्ट्रातील ही पहिलीच छायाचित्र नोंद आहे. सह्याद्री संकल्प सोसायटीच्या संशोधकांनी सोमवारी रत्नागिरी तालुक्याती कुंडी गावातील देवराईमधून ही नोंद केली.
कुंडी ह गांव संगमेश्वर तालुक्यातील देवरूखपासून साधारण १५ कि.मी. अंतरावर आहे. सह्याद्रीच्या खोर्यात हे गाव असल्याने याठिकाणी उच्च प्रतीची जैवविविधता टिकून आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर महिमतगड आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या पायथ्याशी वसलेली श्री केदारलिंगची देवराई आहे. देवराई जपल्याने या ठिकाणी देखील सस्तन प्राण्यांची जैवविविधता उच्च दर्जाची आहे.www.konkantoday.com




