किल्ले रायगडचे दर्शन घेवून परतणार्‍या शिवभक्तांची टेम्पो ट्रॅव्हलर उलटल्याने पाच शिवभक्त जखमी


किल्ले रायगडचे दर्शन घेवून परतणार्‍या शिवभक्तांची टेम्पो ट्रॅव्हलर उलटून झालेल्या अपघातात ५ शिवभक्त जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात माणगाव मार्गावरील पुनाडे घाटात घडला. राहुल नागरे, अमोल फडतरे, आसाराम तोगे, अशी तीन गंभीर जखमी झालेल्या शिवभक्तांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी माणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित जखमींवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button