
काळबादेवी येथील हसनपीर बाबांचा उरूस आज
रत्नागिरी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा तालुक्यातील काळबादेवी येथील हसन पीर बाबांचा उरूस प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आज (३ जानेवारी) साजरा होत आहे.
त्यानिमित्त आज दुपारी २.३० मिनिटांनी भक्तांचे नवस स्वीकारले जातील. रात्री ९.३० मिनिटांनी गिलीफाचा ग्राम दक्षिणेचा कार्यक्रम सुरू होईल. ग्रामदक्षिणा पूर्ण झाल्यावर उत्तर रात्री बाबांचा प्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर उरूस कार्यक्रमाची सांगता होईल
भाविकांनी यावेळी उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अनंत बनप यांनी केले आहे.




