ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक ’लाचलुचपत’च्या जाळ्यात


ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक पंकज शेळके (वय ३१, सध्या रा. ओरोस, मूळ रा. पलूस, जि. सांगली) याला कर्ज अनुदान मंजूर करण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या अधिकार्‍यांनी ओरोस येथील पोलीस दलाच्या पेटोल पंपाजवळ रंगेहाथ ताब्यात घेतले.
जिल्ह्यातील एका व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नवीन आयशर मंजूर ऑगस्ट खरेदीसाठी २६ लाख रुपये कर्ज करण्यात आले होते. यातून त्याने २०२५ मध्ये नवीन ट्रक खरेदी केला आहे. २६ लाख रुपये किमतीच्या या कर्जासाठी कर्जदाराला शासनाकडून ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. या अनुदान रकमेच्या मंजुरीसाठी तक्रारदाराने सिंधुदुर्ग येथील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मंजूर कर्ज रकमेच्या एक टक्का याप्रमाणे २६ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. दरम्यान जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील उद्योग निरीक्षक पंकज शेळके याने २६ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित लाभार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे केली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button