एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या श्रमदान शिबिराची सांगता

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय श्रमदान शिबिराचा सांगता समारंभ करबुडे येथे उत्साहात झाला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, करबुडे गावच्या सरपंच संस्कृती पाचकुडे गाव प्रमुख जानु तांबे, वैभव कळंबटे, रमेश साळवी, सखाराम आग्रे, विलास वेदरे, दिनेश वेदरे, अनंत कारकर, सुरेश कारकर, कृष्णा शितप, सचिन पाचकुडे, दीपिका वेदरे, हरिश्चंद्र वेदरे, सुशांत मोहिते, रामचंद्र वेदरे, मुख्याध्यापक विष्णू सागवेकर इतर ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या या सात दिवसीय निवासी शिबिरात विद्यार्थ्यांनी करबुडे गावच्या परिसरात चार वनराई बंधारे, स्वच्छता अभियान, रस्ते बांधणी, शाळेचे सुशोभीकरण, महिला मेळावा, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवले. तसेच पथनाट्यातून जनजागृती केली.

या शिबिरात संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी भारतीय संविधान, कुंडलिक कांबळे यांनी महिला व्यवसाय व प्रात्यक्षिक, डॉ. अक्षय पाठक यांनी सायबर सुरक्षितता व धोके, प्रा. सुकुमार शिंदे यांनी नव्या युगातील युवकांची कर्तव्ये आणि जबाबदारी, प्रा. डॉ. संजय गवाळे यांनी समाजसेवा आणि युवक नेतृत्व, सानिया कांबळे यांनी महिला सुरक्षा, संकेत महाडिक यांनी युवक व सायबर यासारख्या विविध विषयांवर बौद्धिक सत्रे घेण्यात आली.
शिबिरात नंदादीप नेत्रालय यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सावित्री उत्सव साजरा केला. या दिवशी पाककला स्पर्धा घेण्यात आली. गावातील ४० महिलांनी यात सहभाग घेतला होता.
तसेच फणस किंग मिथिलेश देसाई यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरले. सात दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी असा प्रयत्न केला गेला. शिबिरातील १२३ विद्यार्थ्यांना एनएसएस प्रमुख प्रा. सुशील साळवी, प्रा. सायली कांबळे, प्रा. तेजस्विनी पवार यांनी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे कर्मचारी, तसेच इतर प्राध्यापक वर्ग यांनीही शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button