
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे चिपळूण बाजारपेठ आज बंद
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर आज चिपळूण शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत चिपळूण व्यापारी महासंघटना व एकता व्यापारी संघटना यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत आज दुपारी २ वाजल्यापासून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
या निर्णयास सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षा किशोर रेडीज यांच्यासह अरुणशेठ भोजने, शिरीष काटकर, कांता चिपळूणकर, संदीप लवेकर, उदय ओतारी, बापू काणे, उमेश काटकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या निर्णयामुळे चिपळूण शहरात शोककळा पसरली असून नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.




