उपनगराध्यक्षपदी समीर तिवरेकर निश्चित

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी (दि. १२) होणार आहे. त्यासाठी भाजपच्या बैठकीत समीर तिवरेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. तसेच तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे हे निश्चित झाली आहे. त्यामध्ये भाजपकडून बाबू सुर्वे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंड्या साळवी, अभिजीत दुडये, यांची नावे निश्चित झाली आहेत. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष पद शिवसेनेला तर उपनगराध्यक्ष पद भाजपाला देण्यात आले आहेत. दि १२ जानेवारीला उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून राजू तोडणकर, समीर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे यांची नावे चर्चेत होती. जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे उपनगराध्यक्ष पदासाठी समीर तीवरेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. राजू तोडणकर यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button