इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग याचे आज(11 जानेवारी 2026) रोजी वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.प्रशांतच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 जानेवारीच्या पहाटे प्रशांत तमांग याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. प्रशांतच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत, प्रशांतच्या आवाज आणि साधेपणाची आठवण करून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button