
आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर मैदानामध्ये २२ जानेवारीला सायंकाळी 6 वाजता होणार भक्ती उत्सव
विश्वशांतीचे अग्रदूत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनाक 22 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर मैदानामध्ये सायंकाळी 6 वाजता भक्ती उत्सव संपन्न होणार असून,अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे महत्व वाढवणाऱ्या या सोहळ्याच्या ठिकाणच्या कामाची सुरुवात ही गुरूपूजनाने करण्यात आली.
या गुरुपुजेला आर्ट ऑफ लिव्हिंग टीम रत्नागिरी मधील या भक्ती उत्सवाच्या संयोजिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर ऍड जया सामंत,आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर,नितीशा मोरे,अनघा देशपांडे,निलेश मिरजकरउपस्थित होते.
आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे 22 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरी येथे आगमन होत असून भक्ती उत्सव, ज्ञान व भजन सत्संग यांचा अनोखा भक्ती संगम स्वतः गुरुदेवांच्या उपस्थितीत रत्नागिरी करांना अनुभवायला मिळणार आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीय संस्कृतीमधील योग, ध्यान, प्राणायाम यांचा जगभरात प्रसार करून तेथील जनतेला तणावमुक्त आणि भीती मुक्त केले आहे. सुदर्शन क्रिया या त्यांच्या क्रांतिकारी शोधामुळे जगातील 180 देशांमध्ये करोडो लोकांच्या जीवनात हास्य आणि आनंद निर्माण झाला आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे आगमन रत्नागिरीच्या भूमीत प्रथमच होणार आहे. हा भक्ती उत्सव म्हणजे केवळ एक व्याख्यान नसून ध्यान योग आणि सुश्राव्य भजन संगीताचा त्रिवेणी भक्ती संगम ठरणार आहे.




