’आंबा, मत्स्य’ साठी अणुऊर्जा प्रकल्प हरितक्रांती ठरेल -अजित पाटणकर


अणुशक्ती ही ऊर्जा पर्यावरणाला हानिकारक नसून मातून अनेक फायदे मिळतात. लोकांचा याबाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम चांगले य वाईट यातील फरक समजून सांगणे महत्वाचे आहे. कोकणात अणुऊर्जा प्रकल्प उभारल्यास या भागाचा खर्‍या अर्थाने कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. येथील आंबा व मत्स्य व्यवसायालाही हा अणुऊर्जा प्रकल्प हरितक्रांती ठरेल, एवढी उपयुक्तता यामध्ये आहे. कोणतीही अणुभट्टी अणुबॉम्ब होऊ शकत नाही. भीती पसरविण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. अणुऊर्जा ही गरज असून भारत हा एकमेव देश जगात स्वतः अणुऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) मुंबईचे टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरन्स ऍण्ड कोलॅबोरेशन विभागाचे प्रमुख अजित पाटणकर (पुणे) यांनी व्यक केले
येथील उमाबाई बर्वे लायब्ररी, स्नेहसंवर्धक मंडळ, देवगड आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ, जामसंडे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार ऍड . अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक अजित पाटणकर उमाबाई बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर, स्नेहसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष चारुदत्त सोमण, राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळाचे अध्यक्ष विद्याधर माळगावकर, दत्तात्रय जोशी, डॉ. भाई चांदकर तसेच संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button