
अजितदादांच्या अपघातानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर; सरकारी विमानं अन् हेलिकॉप्टर्ससंदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय
२८ जानेवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे अपघात झाला होता. या अपघातातच त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने सरकारी विमानांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तातडीचा निधी सरकराने मंजूर केला आहे. यासंदर्भातील जीआर देखील आज काढण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ च्या पुरवणी मागण्यांद्वारे सरकारी हवाई वाहनांसंदर्भात मागणी करण्यात आली होती. यानंतर आता वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने या खर्चास मंजुरी दिली आहे. प्रत्येकी ३ कोटींच्या दोन पुरवणी मागण्यांद्वारे एकूण ६ कोटींची कामं मंजूर करण्यात आली आहे. लहान बांधकामे व यंत्रसामुग्री व साधनसामुग्री उद्दीष्टासाठी हा निधी देण्यात आला आहे.




