
प्रवाशांच्या सुविधेसाठी कोकण मार्गावर ’डिजी लॉकर’ सुविधा कोकण रेल्वेने कार्यान्वित केली
’डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती देत प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर ’डिजी लॉकर’ सुविधा कार्यान्वित केली आहे. सुरक्षित अन् स्वयंचलित सुविधेमुळे प्रवाशांना सामान रेल्वेस्थानकांवर सुरक्षित ठेवणे सुलभ झाले आहे. या सुविधेमुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी नवनवे उपक्रम राबवून दर्जा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि एलटीटी येथे ’डिजी लॉकर’ सुविधा यशस्वी केल्यानंतर मध्य रेल्वेने तिचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. कोकण मार्गावरही ही सुविधा सुरू करण्यात आल्याने पर्यटकांची चांगली सोय झाली आहे. जास्त सामान घेवून फिरणे गैरसोयीचे असल्याने हे सामान डिजी लॉ करमध्ये सुरक्षितरित्या ’ठेवणार असल्याने प्रवाशांना विशेषतः पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com




