
खेड तालुक्यातील पिरलोटे येथील नोप्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयातून साहित्य चोरी, एकावर गुन्हा
खेड तालुक्यातील पिरलोटे येथील पाण्याच्या टाकीजवळील नोप्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयातून ८४ हजार रुपये किंमतीच्या साहित्य चोरीप्रकरणी अंकुर अनजनाय श्रीवास्तव (रा. पिरलोटे, मूळ उत्तरप्रदेश) याच्यावर गुरुवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक विनय रंजन विवेकानंद उपाध्याय (३६, रा. लोटे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. नोप्स इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या कार्यालयातून संशयिताने कंपनीच्या कामकाजातील आरटी फिल्मचे १३५ जॉईंटचा खाकी रंगाचा बॉक्स लंपास केला. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
www.konkantoday.com




