
ऑनलाईन औषध खरेदीविरुद्ध दापोली तालुका मेडिकल असोसिएशन व औषध विक्रेता संघटनेची जनजागृती
सध्या ग्राहकांचा ऑनलाईन पद्धतीने औषधे खरेदी करण्याकडे वाढलेला कल चिंताजनक आहे. या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप दापोली तालुका मेडिकल असोसिएशन व औषध विक्रेता संघटनेने केला आहे. याच्या निषेधार्थ आणि जनजागृतीसाठी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जनजागृती अभियान राबवण्यात आले.
ऑनलाईन विक्री होणारी बहुतांश औषधे ही डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय घेतली जात असून त्यामध्ये कमी प्रतीची, बनावट तसेच मुदतबाह्य औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याच यावेळी स्पष्ट करण्यात आले.www.konkantoday.com




