
उद्धव ठाकरेंचे २८ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात! मुंबई महापालिकेसाठी उबाठा गटाची पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करत आहेत.
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध झाली असून, ९ जणांना संधी देण्यात आली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाकरेचे २८ शिलेदार निवडणुकींच्या रिंगणात असणार आहेत.
उमेदवारी दाखल करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने हाचलालींना मोठा वेग प्राप्त झाल्याचे दिसत आहे. काल मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फार्मचे वाटप करण्यात आले आहे. आज ज्यांना हे फार्म मिळाले आहेत, ते सर्वजण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाकडून ज्यांना उमेदवारी मिळाली अशा उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
ठाकरेंच्या शिलेदारांची नावे पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू
प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे
प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान
प्रभाग क्रमांक ४०- सुहास वाडकर
प्रभाग क्रमांक २०६- सचिन पडवळ
प्रभाग क्रमांक ९३-रोहिणी कांबळे
प्रभाग क्र. १०० साधना वरस्कर
प्रभाग क्र. १५६ संजना संतोष कासले
प्रभाग क्र. १६४ साईनाथ साधू कटके
प्रभाग क्र. १६८ सुधीर खातू वार्ड
प्रभाग क्र. १२४ सकीना शेख
प्रभाग क्र.१२७ स्वरूपा पाटील
प्रभाग क्र- ८९ गितेश राऊत
प्रभाग क्र- १४१- विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र – १४२- सुनंदा लोकरे
प्रभाग क्रमांक १३७- महादेव आंबेकर
प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे
प्रभाग १६७ – सुवर्णा मोरे
प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र ९५ – चंद्रशेखर वायंगणकर
प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ
प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर
प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर
प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक




