
खेड तालुक्यातील वेरळ खडकवाडीत सलग दोन घरफोड्या
खेड तालुक्यातील वेरळ गावातील खडकवाडी परिसरात सलग दोन घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत रत्नागिरी येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ मागविण्यात आले असून, श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळ व परिसरात सखोल तपास करण्यात आला.
वेरळ खडकवाडी येथील राहात्या बंद घराचे दर्शनी दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने धारदार हत्याराच्या सहाय्याने तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील कपाटांची तोडफोड करत ६० हजार रुपये रोकड, सुमारे २ लाख रुपये किमतीची दोन तोळ्यांची सान्याची चैन तसेच १ लाख रुपये
किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. वात्रकरणी घरमालक श्री. दिनेश दिलीप पवार (वय ३६), रा. वेरळ, खडकवाडी यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.www.konkantoday.com




