
ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरवात
ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरवात झाली असून, आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झालेले आहे. त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत. मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठी डिसेंबरमध्ये अपेक्षित कासवं आली नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची गरज जाणवल्यानंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षामार्फत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासव संवर्धनाला मोठ्याप्रमाणात सुरवात झाली आहे. या कासवांच्या अंड्यांची पूर्वी तस्करी केली जात होती. काही ठिकाणी अंडी खाद्य म्हणून वन्यप्राणी वापरत होते. यासाठी त्या-त्या समुद्र किनारी असलेल्या गावातील लोकांचे प्रबोधन करून कासव संवर्धनाची जबाबदारी स्थानिकांवर सोपवण्यात आली आहे. गेल्या २० वर्षात ३४ किनार्यांवर कासवांचे संवर्धन केले जात आहे. यंदा जिल्ह्यातील पहिले घरटे गुहागर किना-यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदले गेले. तेथील कासवमित्रांनी ती अंडी संरक्षित केली आहेत.www.konkantoday.com




