
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाला गालबोट, एकाचा बुडून मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाला गालबोट लागले आहे. समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघे बुडाले आहेत यात. एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पवई येथून हे कुटुंब गुहागर मध्ये पर्यटनासाठी आले असताना समुद्रात पोहताना दुर्घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण पाण्यात बुडाले आहे. पत्नी आणि 14 वर्षाच्या मुलाला स्थानिकांनी वाचवले. मात्र 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अथक परिश्रमानंतरही अमोल यांना वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आले. दुपारी एक वाजता ही घटना घडली. अमोल कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची ट्रीप ठरली. समुद्रावर पोहण्याचा आनंद लुटताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा वाचला आहे. दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.




