
लांजा नगर पंचायतीच्या तिसर्या दिवशी आराखड्याच्या ३०२ हरकतींवर सुनावणी.
लांजा नगर पंचायतीच्या प्रारुप विकास आराखड्यावरील हरकतींवर सुनावणीचा तिसरा दिवस बुधवारी पार पडला. या दिवशी एकूण ३०२ हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी ३४० आणि दुसर्या दिवशी २८५ हरकतींची सुनावणी झाल्यानंतर ३ दिवसात एकूण ९२७ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली.बुधवारी तिसर्या दिवशी सकाळपासून लांजा नगर पंचायत कार्यालय परिसरात नागरिकांची गर्दी होती. मात्र दुपारनंतर गर्दीचे प्रमाण हळूहळू कमी झाले. त्यामुळे तिसर्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुनावणीचे काम सुरू होते. या प्रक्रियेत आज ७ ऑगस्ट हा अंतिम दिवस असून अजून ५८५ हरकतींची सुनावणी शिल्लक आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी किती हरकतींवर सुनावणी केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com




