नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक


राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २१ दिवसांत संपविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाचा बिगुल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार आहे.८ जानेवारीपूर्वी या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील उमेदवारांचे आरक्षण काढताना २० जिल्हा परिषदांनी व २११ पंचायत समित्यांनी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक थांबविली आहे. आता पहिल्यांदा आरक्षण मर्यादेचे पालन केलेल्या १२ जिल्हा परिषदांचीच निवडणूक होणार आहे. त्यात सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदा आहेत.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी केली असून, ८ ते १० जानेवारी दरम्यान त्याची घोषणा होईल, असेही सूत्रांनी सांगितले. बाकीच्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र ३१ जानेवारीनंतरच होतील. तत्पूर्वी, जानेवारी- फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button