
गुहागर समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकाना बुडत असताना स्थानिकानी प्रसंगावधान राखून वाचविले,
कोकणात सुट्टीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले असून कोकणातील समुद्रकिनारे हे पर्यटनाचे आकर्षण आहे मात्र समुद्रात उतरलेल्या पर्यटकांना समुद्राचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा बुडण्याच्या दुर्घटना घडतात
आज गुहागर समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांना बुडताना स्थानिकांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविला. अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे पर्यटक अडचणीत सापडले होते. तत्काळ स्थानिकांनी धाव घेत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत एक पर्यटक गंभीर जखमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला पुढील उपचारासाठी गुहागर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रातील धोकादायक प्रवाहामुळे पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




