
कोकणातील प्रसिध्द देवस्थान धुतपापेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या रूंदीकरण व कॉंक्रीटीकरणासाठी पालकमंत्र्यांना साकडे
कोकणातील एक प्रसिध्द देवस्थान व राजापुरातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराचे आपल्या शासनाच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रूपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटक व भाविकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांच्या सोयीकरता देवस्थानाकडे जाणार्या रस्त्याचे रूंदीकरण तसेच कॉंक्रीटीकरण व सुशोभिकरण करण्याची आवश्यकता आहे तशी मागणी कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत व आ. किरण सामंत यांच्याकडे केली आहे.
राजापूर शहरातून मंदिराकडे जाणार्या मार्गावरून चापडेवाडी ते श्रीधूतपापेश्वर देवस्थानकडे जाताना गणपती मंदिरापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. राजापूर शहरातून मंदिराकडे जाणार्या मार्गावरून चापडेवाडी ते श्रीधुतपापेश्वर देवस्थानकडे जाताना गणपती मंदिराप्रर्यंत रस्त्याचे रूंदीकरण अत्यंत आवश्यक आहे.
www.konkantoday.com




