
खेड तालुक्यातील दोघेजण बेपत्तापोलीसांचे आवाहन
रत्नागिरी, दि. 25 ) : खेड तालुक्यातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या कालावधीत नापत्ता झाल्याची नोंद झाली असून, त्यांचा शोध सुरु आहे. या दोन्ही व्यक्तींविषयी कोणास काही माहिती असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.
लक्ष्मण धाऊ ढाणक, वय वर्षे 75 हे जैतापूर, कावणकरवाडी, ता. खेड येथून 1 सप्टेंबर 2017 रोजी 7 वाजताच्या दरम्याने नापत्ता झाले आहे. त्यांची उंची 6 फुट, वर्ण गोरा, केस सफेद, दाढी वाढलेली, बांधा सडपातळ, अंगात सफेद रंगाचे हाफ शर्ट, काळी पॅन्ट.
संतोष शंकर नलावडे, वय वर्षे 37 वर्षे, रा. कुळवंडी, जांभुळवाडी, ता. खेड येथून 17 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची 4 फुट 5 इंच, वर्ण निमगोरा, चेहरा उभट, केस काळे बारीक व डाव्या बाजूस साधारण टक्कल पडलेली, मिशी जाडी, उजव्या हाताच्या मनगटावर जुन्या जखमेचा व्रण, डावा पाय ढोपरात वाकलेला बारीक अपंग, दोन्ही हाताने अपंग असल्याने लाकडी कुबड्या, अंगात फुल हाताचे शर्ट व काळ्या रंगाचा चेक्सचा बरमोडा.




