
कोतवडे ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
रत्नागिरी /
मुख्यमंत्रीसमृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कोतवडे व प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिर,रक्तदाब तपासणी ,मधुमेह तपासणी ,HBA१C तपासणी ,नेत्र तपासणी या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .सदर शिबिराचा मोठ्या संख्येने ग्रामस्थानी लाभ घेतला ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आवश्यक तपासण्या करू शकत नाहीत.


तसेच तपासण्या खर्चिक असल्याने गोरगरीब जनता ह्या तपासण्या करू शकत नाहीत. म्हणून सदर शिबिर स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत मार्फत आयोजित केले असल्याची माहिती सरपंच श्री संतोष बारगोडे यांनी दिली.


या प्रसंगी सरपंच श्री संतोष बारगोडे,उपसरपंच श्री.स्वप्नील पड्याळ ,ग्रामपंचात अधिकारी श्री देविदास इंगळे ,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष श्री स्वप्नील मयेकर,ग्रामपंचायत सदस्य सौ.दिया कांबळे,विस्तार अधिकारी श्री पी.एन.सुर्वे.समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गौरी कांबळे,आरोग्य सेवक श्री.संकेत पंडिये लॅब टेक्निशियन सौ नेहा जाधव,नेत्र तपासनीस श्री.विजय मारे आशा सेविका सौ.वर्षा जोगळेकर, स्नेहल माने,सुनीता शितप,वैष्णवी लांजेकर, दीक्षा सकपाळ ,अंगणवाडी सेविका सौ.प्रीती बारगोडे , श्रीम. रेश्मा जोशी,वारणा ठोंबरे ग्रामपंचायत कर्मचारी श्री भालचंद्र लिंगायत,सौ. प्राप्ती बारगोडे, मयुरी भोसले,भक्ती नाचणकर,सूरज इमल,अशोक कुरटे,मयूर कांबळे,यश लिंगायत आणि कोतवडे परिसरातील ग्रामस्थ लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




