
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथे झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथे झाडावरुन पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. अजित संतोष भोवड (३१, रा. डुगवे-कुरतडे, ता. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटन्ना १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित हा झाडे तोडण्यासाठी तालुक्यातील चाफे गावी गेला होता. दुपारच्या सुमारास झाड तोडत असताना तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अजित याला उपचारासाठी प्रथम मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना १८ रोजी रात्री ८.४५ वाजता अजित याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com




