
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतील भाजपाचे रणनीतीकार अनिकेत पटवर्धन नाराज, आगामी जि प निवडणुकीत लक्षघालणार नसल्याचे केले जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतील भाजपाचे रणनीतीकारम्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेले अनिकेत पटवर्धन यांनी रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत रणनीती आखून भाजपा पक्षाचे उमेदवार निवडून आणले होते राज्यात अनेक ठिकाणी हा पॅटर्न वापरला गेला होता मात्र पटवर्धन घेतलेल्या भूमिकेबाबत पक्षातील काही लोकांना भूमिका पटली नव्हती त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व अन्य निवडणुकीत आपण बाजूला होणार असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी जाहीर केल्यानेभाजपामध्ये खळबळ उडाली आहे याबाबत पटवर्धन यांनी आपली भूमिका जाहीर केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की नगरपरिषद निवडणुकीत आपण
रत्नागिरी जिल्ह्यातील झालेल्या सर्व नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मी घेतलेल्या भूमिकेमध्ये अनेक जणांना ती भूमिका पटलेली दिसून येत नाही माझी भूमिका पार्टीचं महत्त्व आणि पार्टी बद्दल असलेलं मी काय पार्टीसाठी करू शकतो त्याचं योगदान मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेब रत्नागिरी जिल्ह्यासाठी जे जे करतात जे जे मला सांगतात ते मी करण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक लोकांना ही जे काही मी नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी जे जे काही मी केलं ते अनेक जणांना रुचलेलं दिसून येत नाही आणि ते आवडलेले दिसून येत नाही त्याच्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मी कोणतीही पक्षाची भूमिका अथवा पक्षाची रचना यामध्ये कोणतेही मी लक्ष देणार नाही या रचनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते जिल्हा म्हणून ज्यांना कोणाला जबाबदारी देतील ते जिल्हा म्हणून तेथे जबाबदारी फार पाडतील परंतु यापुढे रत्नागिरी जिल्ह्याच्या नगरपालिका असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत निवडणूक असतील यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सहभाग घेणार नाही व आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये व अन्य ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी कोणताही प्रकारे सहभाग घेणार नसून मी आजपासून भारतीय जनता पार्टी म्हणून जी काही माझी भूमिका करत होतो ते आजपासून मी थांबवत आहे व यापुढे मी कोणत्याही प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे काम रत्नागिरी जिल्ह्यात करू इच्छित नाही तरी मी आपल्या सगळ्यांची या ग्रुप या ग्रुपमधून मी आता सर्व ग्रुप मध्ये ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या ग्रुप मध्ये आहे त्या ग्रुप मधून मी स्वतःहून एक्झिट होत आहे माझ्याकडून झालेल्या सर्व चुकांची मी स्वतःहून तुम्हा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो
अनिकेत पटवर्धन यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आगामी जिल्हा परिषद व न्याय निवडणुकीत भाजपाची वाटचाल कशी असेल याकडे आता लक्ष लागले आहे




