
मूरगाव ता.राजापूर येथील सरपंच वैष्णवी आकटे यांनी ग्रामपंचायत सदस्यांसहित आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजापूर
मूरगाव तालुका राजापूर येथील सरपंच वैष्णवी आकटे यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे मूरगाव परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून स्थानिक पातळीवर पक्षसंघटन अधिक बळकट होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून विकासाच्या माध्यमातून गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच वैष्णवी आकटे यांनी शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच वैष्णवी आकटे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर आपटे विराज आकटे, वाडी प्रमुख रमेश आकटे, चंद्रकांत कोळेकर, सदैव आगटे सुरेश आकटे,संदीप आकटे, गजानन आकटे,शाखाप्रमुख केशव गुरव सचिन आकटे,शमिका बने यांनी प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी संघटक आत्माराम बुवा विभागप्रमुख शैलेश साळवी उपविभाग प्रमुख उदय राणे ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा साळवी शाखाप्रमुख मधु चव्हाण यांच्यासहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



