
न्यू मांडवे धरण प्रश्न प्रकरणी आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम, जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव
तुमच्या हातात एक महिना आहे. या कालावधीत जे काही करता येईल, ते करा. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम असून तो निर्णय मागे घेणार नाही, अशी भूमिका जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्पष्ट केली. न्यू मांडवे धरणप्रश्नी २६ जानेवारी रोजी आत्मदहनाच्या -निर्णयावर ठाम असल्याची भूमिका ग्रामस्थांसमवेत झालेल्या सभेत मांडली.
जाधव यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी लवकरच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेवून पुढील निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वित्त मंत्रालयात अडकलेली फाईल पुढे नेण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे कोअर कमिटीने निश्चित केले. न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षापासून रखडला आहे. या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी जल फाऊंडेशन अध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
www.konkantoday.com



