
चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील धनगरवाडी येथे सांबर आणि बिबट्या अचानक आडवा आल्याने मोटारसायकलस्वार जखमी
चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील धनगरवाडी येथे बिबट्याच्या भक्ष्याच्या पाठलाग करत असताना एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धनगरवाडी येथील रहिवासी अभय रामू बाबदाने हे शुक्रवारी रात्री दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्या समोरून अचानक सांबर धावत आले. त्याच वेळी त्या सांबराचा बिबट्या पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले.
अचानक समोर आलेल्या सांबराने त्यांना धडक दिली. बिबट्या देखिल समोर आला. त्यामुळे गोंधळ उडाल्याने अभय बावदाने यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे ते काही वेळ बेशुद्ध अवस्थेत पडून होते. शुद्धीवर आल्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
www.konkantoday.com




