
चिपळुणात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा हल्ला; एकजण जखमी
चिपळूण शहरातील पाग बौद्धवाडी येथील रहिवासी विद्याधर जाधव यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. जाधव हे भोगाळे येथील महावीर मार्केटसमोरील आपल्या शेतात जात असताना परिसरातील भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एका कुत्र्याने जाधव यांच्या पायाला चावा बतला. कुत्र्याचे तब्बल पाच दात त्यांच्या गुडघ्याजवळ रुतले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने कामथे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आवश्यक उपचार व लसीकरण करून त्यांना घरी सोडण्यात आले.
www.konkantoday.com




